Tuesday, 3 May 2016

मला नाही माहीत

मला नाही माहीत मी तुझ्या जिवनातील पहीली व्यक्ती आहे की नाही....
आणी मला माहीत करून घ्यायचेही नाहीये....
पण जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यावर येवढं प्रेम करेन की,
विश्वासाने उभ्या जगाला सांगु शकेन...
तुझ्या जिवनातील कदाचित पहीली नाही पण शेवटची व्यक्ती फक्त मीच असेल....
S.K

" सैराट "

खरं प्रेम भेटणं कठीणं झालं...
खरं प्रेम करणारं कोणी नाही राहिलं...
आणि भेटलं तर जगाने नाही मान्य केलं...
खरं प्रेम एकदा शोधावं म्हटलं...
तेव्हा कुठं परशाला आर्ची मध्ये दिसलं...
प्रेमामध्ये दोघांच मन एवढं गुंतलं...
जगामध्ये काय चालं याच भान नाही उरलं...
भान जेव्हा जाग्यावर आलं...
तेव्हा प्रेमामध्ये गरीबी-श्रीमंती दोन भाग झालं...
गरीबी-श्रीमंतीमुळं त्यांच प्रेम जगानं मान्य नाही केलं...
तेव्हा दोघांनी पळुन जायचं ठरवलं...
दोघांनी सुखाचा संसार मांडायचं ठरवलं...
काही दिवस उपास मार करावं लागलं...
उपास मार करुन दिवस काढलं...
तेव्हा कुठं चांगलं दिवस बघायला भेटलं...
चांगलं दिवस होत त्यांच आलं...
दोन जिवाचे तिन जिव होतं झालं...
राक्षसी जगाला हे नाही बघावलं...
तेव्हा त्यांच्या जिवावर हे जग उठलं...
मित्रांनो,
सिनेमाचा शेवट मला नाही आवडला...
S.K

झोप उडून गेली,

झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली.,
.
प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली.,
.
कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली.,
.
माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली.,
.
माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली...
S.K

"ती व्यक्ती कधीच कुणावर प्रेम करणार नाही.."

कुठल्याही व्यक्तीच पाहिल प्रेम
बनणे म्हणजे काय मोठी गोष्ट नाही..
.
जर बनायचे असेल तर त्या व्यक्तीच
शेवटच प्रेम बना..
.
कारण..
.
तुम्ही कधीसुद्धा हा विचार करून नका..
.
की,
.
ती व्यक्ती तुमच्या आधी कुणावर
प्रेमकरत होती / करत होता..
.
प्रयत्न असा करा..
.
की,
.
तुमच्या नंतर
"ती व्यक्ती कधीच कुणावर प्रेम करणार
नाही.."
S.K

"हळवं प्रेम"

तो म्हटला,
प्रेम करतो तुझ्यावर
ती म्हटली मी करत नाही
तो म्हटला,
तू कर किंवा करू नको
त्याने माझ्या प्रेमाचे कही अडत नाही
तो म्हटला,
तूच आहेस सगळीकडे
तुझ्याविना जगणे अशक्य आहे
ती म्हटली,
थांबव इथेच स्वताला
मी तुझी होणे कस शक्य आहे ?
तो म्हटला ,
तू माझी हो अथवा होउ नकोस
माझं प्रेम कुठे थांबणार आहे
माझ्या प्रेमाचा उच्चांक तर
सतत वाढत जाणार आहे
ती म्हटली ,
भिती नाही का रे वाटत तुला
असे हळवे स्वप्न पाहताना
स्वप्न कोसळले की वेदना होतात
कोसळून जाशील असा वाहताना
तो म्हटला ,
कोसळण्याची भिती कोणाला
प्रेमाचा तुझ्या आधार आहे
प्रेमा न करण्याचे संदर्भ तुझे
तितके मात्र निराधार आहेत
प्रेम नाही म्हणतेस मला
काळजी माझीच करत असतेस
हीच अबोल भाषा प्रेमाची
मला तुझ्यात गुंतवून ठेवते
S.K

Monday, 2 May 2016

कारण होती माझ्या हसण्याचं..,,,,

"एवढी मोठी शिक्षा मिळाली,
मला तिच्यावर प्रेम करण्याची..
.
की.....,
मनातून रडतोय तरी,
ईच्छा आहे हसण्याची..
.
.
.
माझे दुख कसे सांगू तुम्हाला..,
काहीचं कळेना..
हे दुख तिनेचं दिलेय..
जी कारण
होती माझ्या हसण्याचं ... 

S.K

प्रेमाच्या नजरेनं..,,

कसा बघू मी कुणाकडे,
प्रेमाच्या नजरेनं...!
नजरेस बांधून ठेवलंय,
तुझ्या प्रेमानं...!
कसा गुंतेन मी,
पुन्हा कुणातही...!
मनास गुंतवून ठेवलंय,
तुझ्या मनानं...!
उलट भीती वाटते,
कुणाकडे मला बघण्याची...!
इतकं झपाटून टाकलंय,
प्रिये तुझ्या चेहऱ्यानं....!!!
S.K

मी खुप खुश आहे,

आज मी खुप खुश आहे,
कारण ?????
आज मी तीला कायमचा विसरण्यात
यशस्वी झालो..
आज मी तीची दिवसात फक्त दोनदाचं
आठवण काढली,
एक म्हणजे श्वास घेताना आणिदुसरी
म्हणजे श्वास सोङताना.. 
S.K

मला काही काही..!!

मिटे रात माझी
विझे चांदवाही
तुझा खेळ होतो,
असाही-तसाही..
निःस्तब्ध आहे
इथे डोह माझा
जगणे तुझे अन्
प्रवाही-बिवाही !
फुकाचे दिलासे
न द्यावे मनाला
खोटेच बोले
आता आरसाही
दुष्काळ माझ्या
मनी दाटलेला
पाऊस गाणी
तुझी बारमाही !
नभाला उजळते
तुझे हासणे पण
दैवास माझ्या
नकोसा दिवाही !
संवेदनांची
फुलू दे कवीता
नको याविना रे
मला काही काही..!!

S.K

Friday, 29 April 2016

सांग ना तु फक्त माझी कधी होशील का. .?

विसरलो जरी मी
msgकरायला ,
तरी स्वतहुन msg करून
माझ्याशी कधी
भांडशील का. .?
दुसऱ्या मुलीचा कधी
विषय निघालाच
तर,
स्वतः चा हक्क
कधी
दाखवशील का. .?
Busy असतानाही
भेटीसाठी आपल्या,
हट्ट भलताच
तु धरशील का. .?
अन् मग तो हट्ट
पूर्ण करण्यासाठी,
संधी मला तु कधी
देशील का. .?
दुरावतानाही तु
पुढील भेटीची,
वचने मला
कधी मागशील का. .?
अन् मग लगेचच
पुढील भेटिचा,
दिवस अन् वेळ तु
ठरवशील का. .?
जाणार नाहीस कधी
तू सोडून मला,
हमी अशी
तू कधी
देशील का. .?
मी आहे अन् असेन
फक्त तुझ्यासाठीच,
पण तू कधी
माझी
होशील का. .?
थांबेल आयुष्यभर
तुझ्यासाठी,
पण मला तू
होकार कधी देशील
का. .?
अन् तुझ्यासाठीच्या कविता,
तू आवडीने
कधी
वाचशील का. .?
चुकून का होईना
काही क्षणांसाठी तरी,
माझ्यावर
प्रेम कधी तू
करशील का. .?
अन् मग स्वतःच्या
इच्छेने तू,
फक्त माझी
कधी
होशील का. .?
सांग ना तु फक्त माझी
कधी
होशील का. .?
S.K

Thursday, 28 April 2016

एक होती गोड परी..,,,

एक होती गोड परी
माझ्या स्वपनात असणारी,
जरी असली ती तीच्या घरी
तरी माझ्या ह्रुदयात वसणारी.
एक वेळ होती जेव्हा
होती ती माझी राणी,
आठवण तीची आली की
येते डोळ्यत पeती माझ्या पासुन
खुपच दुर,
भासवतात मला तीच्या
गोड आवाजाचे सुर.
तीला वाटत असेल
मी तीली वीसरलो,
कसे सांगु तीली एक-एक
क्षण मी कसा जगलो.
तीने प्रेम व्यक्त
केले नाही कधीच,
दूर गेली ती मला
सांगण्याच्या आधीच.
मी मात्र तीला माझे
प्रेम दाखवत आलो,
तीने नकार दीला तेव्हा
मी खुप दुर गेलो.
आता तीली कदाचीत माझी
आठवण येत नसावी,
पण आशा करतो ती कुठेही
असली तरी सुखी असावी...
S.K

निरोपाशिवाय जाणे तुझे...,,,,

साधा आणि ‪प्रमाणिक‬ असलेल्या मुलाला
कधीच ‪Gf‬ मिळत
नाही
पण त्याला ‪जीवनसाथी‬ अशी मिळते
जिला बघून ‪सर्वांची‬
जळते ....……
S.K

Wednesday, 27 April 2016

प्रेम करा,पण एका सोबतच करा...

प्रेम करा...
पण एका सोबतच करा...
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...
मात्र कधी कोणाच्या भावनेशी, स्वप्नाशी खेळू नका...
कारण,
जेव्हा जीव रडतो ना...
तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत...
S.K

Tuesday, 26 April 2016

तुझीच वाट बघतोय मी...,

प्रेमात तुझ्या पडून सखे,
वाटायचं जीवनात तरलोय मी...!
पण मन तुझ्या ताब्यात देऊन ही,
प्रेमातच अधिक हरलोय मी...!
प्रेमातच पडल्यानंतर वाटायच,
प्रेमामुळे अधिक बहरलोय मी...!
पण प्रेमात पडल्यानंतरच सखे,
तुझ्यासाठी क्षणोक्षणी झुरलोय मी...!
तू माझी जीवनभर साथ द्यावीस,
हीच अपेक्षा करतोय मी...!
तुझ्यासाठी खूप तडफडलोय मी,
तुला भेटण्यासाठी सखे धडपडलोय मी...!
प्रेमाच्या वाटेवर येणाऱ्या काट्यांना,
तुडवत तुडवत यायचो मी...!
तुझ्या आठवनींमध्ये सखे,
खूप खूप रडलोय मी...!
तुझ्या आठवणीसाठी सखे,
स्वतःच्या मनाशी झगडलोय मी...!
हृदय माझं सारखं विचारतय सखे,
कधीतरी माझा विचार करशील तू...?
माझी आयुष्यभर साथ देण्यासाठी,
कधीतरी माझा हात धरशील तू...?
माझ्या मनातील भावनांना अजून सखे,
कोणीच नाही समजू शकलय...!
कुणीतरी मला समजून घ्यावं,
याच आशेन जगतोय मी...!
ती समजून घेणारी तुच असावीस,
यासाठी तुझीच वाट बघतोय मी...!
S.K

भीती वाटते...,

भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते
विसरन्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना...
S.K

आयुष्यात एक तरी BF असावा.....

आयुष्यात एक तरी bf असावा.....
Pro करण्या आधी एक चांगला मित्र.
आणि gf झाल्यावरही एक चांगला bf असणारा..
एक तरी bf आसावा....

फोनवर तासनतास बोलणारा...
बोलताना मधेच लाडात येणारा....
तर लाडात येउन किस मागणारा..
एक तरी bf असावा.............


आपल्या बर्थडेला सर्वात आधी विश
करणारा..
नंतर

surprise gift देणारा......
आपल्याला आनंदी पाहु बघणारा........
एक तरी bf असावा.....


आई ओरडल्यावर आपली समजूत घालणारा...
तर कधी hug देऊन मनाला relax करणारा...
एक तरी bf असावा...


पावसाळ्यात पावसाचा आनंद लुटणारा....
दोघानी एकाच छत्रीतून जाण्याचा हट्ट
धरणारा.
चालताना मधेच पाणी उडवणारा.....
अणि नंतर i love you म्हणणारा......

एक तरी bf असावा.........

आपला future कस असाव हे imagine
करणारा.....
पण आपल्याला खोट स्वप्न न दाखवणारा..
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा...
एक तरी bf असावा..
S.K

विसरलोय मी.तिने मला " मला विसर " म्हटलेलं...

विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट
विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस
विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष
विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण
विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण
विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....
S.K

बघं, माझ्या सारखं कुणाला जमते का?

जाऊन पहा दुर
बघं, आठवण माझी येते का?
आली जरी आठवण तर
बघं, विसरता मला येते का?
स्वप़्नात जर मी आलो
तर बघ हसू ओठी येते का?
डोळे बंद केले की
बघं, चेहरा माझा दिसतो का?
अडचणीत तु असलीस तर
बघं, डोक्यात माझं नाव येतं का?
एकट्यात शांत बसून तु
ऐक हृदयाचे ठोके
नाव ओठी येईल माझे
जेव्हा पाणावतील डोळे तुझे
दडपण नको घेऊ मनावर
जबरदस्ती कसलीच नाही तुझ्यावर
वेळ जेवढा हवा तेवढा घे
पण हृदय माझे मला परत दे
अडकलो आहे तुझ्यात पुर्ण
आता तरी माझ्या हातात हात दे
बस्सं एकदा पहा माझ्याकडे
हवं तर शरीरातले प्राण घे
शोध घे अख्ख्या दुनियेत
बघं, असा वेडा पुन्हा मिळतो का?
प्रेम करतील ही खुप सारे
बघं, माझ्या सारखं कुणाला जमते का?
S.K

वाटत आहे अजून पण ति रडत असेल.....,,,

लपून लपून कुठेतरी पोस्ट माझी वाचतच असेल. ..
.
माझ्या फोटोशी एकटेपणात भांडत असेल..
.
जेव्हा माझी आठवण तिला येत असेल ..
.
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...
.
कुठल्यातरी दुसर्या नावाने फेसबुकवर आली तर असेलच..
.
ID एखादी फेक नक्कीच बनवली असेल..
.
कोणी माझ्यात कमी काढली तर चिडत असेल..
.
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...
.
माझा प्रत्येक अपडेट तिला आता पण छडत असेल..
.
माझा चेहरा तिच्यासमोर येतच असेल..
.
जेव्हा पण ति कोणाकडून दुखावली जात असेल..
.
तेव्हा तिला माझी आठवणयेत असेल..
.
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...
.
लागली आहे सवय माझ्या कवितांची अशी सुटेल कशी..
.
घाबरत घाबरत रिक्वेस्ट मला पाठवली असेल..
.
उगाच सोडल तुला अस बोलून स्वतःशीच भांडत असेल..
.
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...
.
खरच परत मिळावा तो मलायेवून त्याच प्रेमाच्या गोष्टी कराव्या त्याने पुनहा..
.
हाच विचार करून मंदिरात माथा रगडत असेल.
..
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...
S.K

Monday, 25 April 2016

तुला पाहताना फक्त......,,,,,,,,,,

तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसे
वाटते..
खरच..किती सुंदर कल्पना असते ना
प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे
वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे
वाटते.

S.K

शब्दांत नाही सांगता येणार..........,,,,,

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
.
अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
.
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?
.
ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?
.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
.
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
.
चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?
.
हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?
.
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
.
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
.
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
.
मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?
.
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
.
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
S.K

अस कधीतरी घडाव,,

अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
.
.
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव...
.
.
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
.
.
मी दिसताच तिने मग हळूच हसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
.
.
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल
द्याव...
.
.
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,
स्वप्नातही तिला मीच दिसावं....
.
.
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव
S.K

Friday, 22 April 2016

खुप सारं प्रेम करेन......,,,

एक सांगु का तुला......
तु खुप आवडतेस मला.
पण एक दु:ख होते मनाला..
कारण नाही हिम्मत होत हे सांगायला..
प्रिये समजत नाही का मनातल्या भावना तुला...
जरा तु समोर येऊन आधार दे ना माझ्या जिवाला.
मि खुप व्याकुळलो फक्त पाहण्यासाठी तुला..
असे गच्च पकडुन तुझ्या ह्रदयाला ..
एक मिठी मारावी म्हणतो तुला....
खुप प्रयत्न केले मी हे तुला सांगायला..
नाही सोडाव वाटतं एकटं या जीवाला.
भेट ना ग सखे एकदा तरी मला..
खुप सारं प्रेम करेन त्या
एक दिवसाच्या भेटीला..

S.K

Thursday, 21 April 2016

तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे...,,,,,

खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून
अशीच खूप महिने अन वर्ष हि जातील
पण या आठवणी का संपत नाहीत.
का या आठवणी रोज रोज येत राहतात
त्या येताना एकट्या हि नाही येत
येताना अश्रू हि सोबत घेवून येतात
विसरली असशील तू मला
अन विचार करत असशील मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो
रोज त्याच आठवणी जगताना
रोज तेच अश्रू रडताना
मी खरच नाही कंटाळलो.
हे आयुष तुलाच दिले होते
आणि तू का अशी वागली
हेच कधी कळले नव्हते..
तू परत नाही येणार हे नक्की आहे
पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.
S.K

पण शेवटी आठवण यणारचं...,

हे जग सोडून गेल्यानंतर,
माझी एकच इच्छा असेल
ती म्हणजे,
पुढच्या जन्मात आश्रू बनून
तुझ्या डोळ्यात जन्माला येण..
आणि जर तस झालंच,
तर मी जगातील असा एकमेव
नशीबवान प्रियकर असेल...
जो तुझ्या चमकणार्या सुंदर
डोळ्यात जन्म घेईल,तुझ्या गोड गालांवर राहील आणि तुझ्या
नाजूक ओठांवर शहीद होईल..¡:
S.K

मी ‪चुकलो‬ होतो..!!

आज असाच ‪एकटा‬ बसलो होतो,
.
तिच्या
‪आठवणीत‬ थोडं ‪फसलो‬ होतो..
.
वाटलं तिच्यावरती प्रेम करुन,
.
नक्कीच कुठेतरी मी
‪चुकलो‬ होतो..!!
S.K
smile emoticon

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा...,

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यात
हीपावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या
पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य
वाढत जातं
... तसंतसं त्याच्या
सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य
धुसर धुसरवाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची.. .
पण...हातात माझ्या हक्काच
असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा
दोघांनीही आता
सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास
दोघांनीही पाळायला हवा....
S.K

ते खरे प्रेम असते....,

जे मनापासुन केले
तरी भेटत नाही,
कदाचित ते खरे
प्रेम असते. .
मनात असुन पण जे
व्यक्त करता येत नाही,
कदाचित ते खरे
प्रेम असते. .
लांब जाऊन पण जे
नेहमी आठवत ते ,
बोलताना पण नकळत जे
डोळ्यातुन
आश्रु आणत. .
कदाचित ते
खरे प्रेम
असते. .
आपल्या सोबत
भांडताना,
पण . .?
आपल्यावर हक्क सांगते,
भांडण झाल्यावर
आपल्याला प्रमाणे
मिठीत घेते. .
कदाचित ते
खरे प्रेम असते. .
जे मनातुन रडुन पण
आपल्याला हसवते,
डोळे बंद केले तरी,
मनात दिसते. .
कदाचित ते खरे
प्रेम असते. .
जे मनापासुन हव असताना
कधीचं
मिळत नाही,
आणि ज्याना मिळत,
त्याना ते
टिकवता येत नाही. .
कदाचित ते खरे
प्रेम असते. .
S.K

Wednesday, 20 April 2016

ती पाहते.........,

ती पाहते यार माझ्याकडे
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?
जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?
S.K

BEST PROPOSE........,

BEST PROPOSE BY STUDENT
I AM BAD in ENGLISH
BUT i can tell you that I LOVE YOU....
I am BAD in GEOGRAPHY
BUT
i can tell you that you LIVE in my
HEART...
I am BAD in HISTORY
BUT
I can REMEMBER when i FIRST saw
you.
I am BAD in CHEMISTRY
BUT
I can tell WHATS the REACTION
when you SMILE..
I am BAD in PHYSICS
BUT
I can tell the INTENSITY of SPARK of my
EYES when they SEE you..
I am BAD in every SUBJECT
BUT
I can TELL ALL..
I will PASS all SUBJECTS if the TOPIC
is YOU heart
S.K

प्रेम म्हणजे काय.?

प्रेम म्हणजे काय.?

उत्तर : जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं. कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटावं असं वाटायला लागतं.
कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात.
होतं का नाही हे?
या वयात बहुतेक सगळ्याच मुला-मुलींना हे होतं. आता प्रत्येकाला हे वाटायलाच पाहिजे असा काही नियम नाही पण बहुतेक जणांना हे वाटतं.
कुणी तरी आपल्याकडे पाहावं, आपल्याला सतत भेटावं, बोलावं असं वाटायला लागतं आणि ते नैसर्गिक असतं.
कसं आहे, आपल्या शरीरात आणि मनात जे बदल होतात त्यामुळे हे आकर्षण वाढू लागतं.
सतत आपल्याला आवडणारी व्यक्ती, तिचं बोलणं, राहणं, तेच मनात येत राहतं.
कधी-कधी तिचा स्पर्श व्हावा, तिला स्पर्श करावा, असंही वाटतं. ह्यात वाईट काही नाही. तसंच प्रत्येकाला हे होईलच असा काही नियम पण नाही.
पण आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं?
एखाद्याला आपण आवडतो, हे त्या व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून समजतं. तिच्याशी किंवा त्याच्याशी बोलणं, त्याचा किंवा तिचा आवाज ऐकणं, स्पर्श होणं या सगळ्या गोष्टींनी आपण सुखावतो.
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला भेटायला आपण आतुर होतो, तो किंवा ती नाही भेटली तर अस्वस्थ होतो, दुःखी होतो.
असं तुम्हालाही होत असेल.
प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत.
महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत.
एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा आवडत नसेल तर आपण जबरदस्ती करू शकत नाही.
तसंच एखाद्या मुलीने नकार दिला तर उगीचचं जेवण नको, खेळायला नको, अभ्यास नको, काम नको, मित्र नकोत असं करत बसण्यात काहीही अर्थ नाही. या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.
आपल्याला कुणी पण आवडो, त्या मुलीला किंवा मुलाला जर आपण आवडत नसलो किंवा समोरच्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना नसतील तर आपण त्या मान्य करायला पाहिजेत आणि आपल्या भावना आपल्यापाशी ठेवल्या पाहिजेत.
जबरदस्ती करून, मागे लागून, पिच्छा पुरवून कुणाचं प्रेम मिळत नसतं.
तसं फक्त सिनेमात होतं.
कारण सिनेमा हा माणसांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे घडवलेला असतो. आता समजलं का प्रेम म्हणजे काय असतं ते?

बरोबर की नाही ..
तुम्हीच ठरवा
S.K

तुझे माझे कधी..,

तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसली तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलीस की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते
जगण जगणंच वाटत नाही

S.K

आजकाल मला तुला...,

आजकाल मला तुला छळायला खूप
आवडते,
चालता चालता उगाच मागे वळून
बघायला आवडते
मला बघताच
तुझ्या हृदयाच्या वाढणाऱ्या ठोक्याना ऐकायला आवडते,
आणि हळूच एक स्मित हास्य देवून रोज
तुझे काळीज
चोरावेसे वाटते.........
खूप काही बोलायचे असते,
... खूप काही ऐकायचे असते,
तसे तर मला तुला रोजच भेटायचे असते
रोजच्या या धावपळीच्या जगात
नवीन आयुष्य जगायला शिकायचे
असते,
वेळच अपुरा पडतो
नाहीतर मला आयुष्यभर तुलाच ऐकत
बसायला आवडले
असते..

S.K

भरुन येतिल डोळे तुझे...,

भरुन येतिल डोळे तुझे मी या जगात नसताना,,, एकट वाटेल तुला कुठेतरी बसताना,,, पण कधी रडत बसु नकोस,,, कारण तुला माहित आहे♡♡♡ मला पहायचे होते तुला नेहमीच हसताना

पत्येक ठिकाणी शोधतो चेहरा तुझा ,♡♡साग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा ,,,डोळ्यातुन पडणारा पत्येक थेब म्हणतो साग ना तुझ्याविना राहु कसा♡♡♡

ती समोरून जाताना खाली मान घालुन जाते...# कदाचित तिला आता कळले असेल ,,♡कि हाच तो # Kiran (S.K)  खुप प्रेम करतो आपल्यावर,जे मी ओळखु शकले नाही.
S.K

ती नक्की येईल...,

ती नक्की येईल माहितीये मला
तिला आता राग आलाय...
पण ती नक्की येईल...
खूप खूप रडली होती ती जातांना
तुही रडशील म्हणाली होती मी नसताना
नाही सांगू शकलो एक गोष्ट मी तिला
ती निघताना ........
पण ती नक्की येईल...
खूप खूप छान दिसायची ती लाजताना
दोन्ही गालावर खळ्या असायच्या ती हसताना
नाही सांगू शकलो जग आहेस तू माझ
तिच्या घाऱ्या डोळ्यात बघताना...
पण ती नक्की येईल...
एकेक दीर्घ श्वास घ्यायची ती जवळ असताना
झटकन हात सोडायची आजूबाजूला कुणी असताना,
नाही विचारू शकलो कसा जगू तुझ्याविना
हे तिला बोलताना...
पण ती नक्की येईल....
एक छोटास कौलारू घर,अंगणात प्राजक्ताचा सडा,
फाटकावर चमेलीचा वेल आणि पडवीत एक गोंडस कुत्रा मोती,
अंगणाच्या एका कोपऱ्यात रातराणी अन
दुसऱ्या कोपऱ्यात अबोली...
हे सर्व तिला आवडत ना म्हणून ती येईल...
डोळे भरून येतील तिचे हे सर्व बघताना,
खूप प्रेम करते तुझ्यावर म्हणेल ती मिठीत शिरताना,,.........
पण ती नक्की येईल...
S.K

कोणाच्या आठवणीने..,

कोणाच्या आठवणीने
परत परत रडुन
आपल्या ईवल्याश्या हृदयाचा
त्रास कमी नाही होत. .
प्रेम तर नशिबात लिहिलेल असत,
त्या व्यक्तीसाठी झुरुन
ती व्यक्ती आपली नाही होत...
S.K

ती येत होती,

ती येत होती,
मला सतवण्यासाठी...
मी जात होतो,
तिला मनवण्यासाठी...
ती म्हणत असे की,
तुझं माझ्यावर प्रेमच नाही...
आणि...!!
मी बोलत असे की,
तुझ्याशिवाय दुसरं कुणीच
मला आठवत नाही...
तिने मला सोडून दिलं,
कुणा दुस-यासाठी...
आणि..!!
मी ही जग सोडलं,
फक्त तिच्यासाठी.........
S.K

प्रेमात हरलात..,

प्रेमात हरलात म्हणुन
स्वत:ला दोष देत बसु नका
कदाचित देवाने त्याहीपेक्षा
चांगली प्रेम करणारी व्यक्ती
तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेल...
S.K

मला फक्त...,,,,

मला फक्त,
तुझ्या सोबत हसायचे आहे...!
तुझ्या खांद्यावर,
डोके ठेवून रडायचे आहे...!
मन मोकळे करून,
तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे...!
हरवून स्वतःला,
तुझ्यात शोधायचे आहे...!
मला काहीच नको,
फक्त तुझी सावली बनून जगायचे आहे...!
नशिबाच्या या खेळात,
तुला नेहमीच जिंकायचे आहे...!
S.K

Lovestory....,

प्रत्येकाची Lovestory जरी
Different असली तरी
त्यांच्या Break-Up ची
Story Same असते..
S.K

Thursday, 14 April 2016

म्हणतात की..................,

म्हणतात की premat जेवढी भांडण केली तर prem# वाढते,,
पण कधी एवढे पण नाही करावे ,
कि तो/ ती एवढे लांब जातील .
कि आपल्याकडे पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच शिल्लक राहनार नाही .
S.K

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून...,

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून
रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून
रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच
पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन
रडली....! आज तिचा फोन आला.....
...
.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले
"....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढेपावसाचा वर्षाव
कमी वाटू लागला ....
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली " माफकरशील ना मला "...
.
.
.
तो म्हणाला
" माफी कसली मागतेसअपराध्यासारखीकर्तव्य
पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्याजन्मी होशीलनक्की
माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्या
कोपर्यात असशीलनेहमी".
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला"
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला"

S.K

Wednesday, 13 April 2016

कोणी कोणासाठी असच वेड होत नाही...,

कोणी कोणासाठी असच वेड होत नाही
जगण्या - मारण्याच्या शपथा
तो उगाच घेउ लागत नाही
तिच्यासाठी काहीही करायला तो
असाच तयार होत नाही
त्यालाही कारणीभुत तीच होती
तिची पाहण्याची नजर त्याला
वेड लावून गेली
ओठातून तिच्या शब्द हि फुटले नाहित
मात्र
डोळ्याने ती खूप काही बोलून गेली....
S.K

Tuesday, 12 April 2016

जेव्हा तुझी लग्नाची...,



जेव्हा तुझी लग्नाची
तारीख असेल,
तेव्हा माझे
मरण असेल. .?


जेव्हा तुझी
हळद असेल,
तेव्हा माझी शेवटची
अंघोळ असेल. .?

जेव्हा तू चार-चौघातून
निघत असशील,
तेव्हा मी
चार-चौघातखांद्यावर
असेल. .?

जेव्हा तू लग्नाच्या
मंडपात अशील,
तेव्हा मी
स्मशानात असेल. .?

जेव्हा तू अग्निच्या
सात फेरे घेत असशील,
तेव्हा मी
अग्नित जळत
असेल. .?

एक वर्षानी
फरक एवढाच असेल की,
तुझ्या घरी तुझ बारस असेल. .
आणि
माझ्या घरी
माझ वर्षशादध असेल. .?
S.K

एखादी व्यक्ती आवडणे...,

एखादी व्यक्ती आवडणे
हे नैसर्गिक आहे...
.
.
तीच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे...
पण समोरच्या व्यक्तीच्या मनातल न जाणता न समजता प्रेम करत राहाणे..
हा मुर्ख पणा आहे का..?
कारण प्रेम हे होते पण कोणाला करण्यास भाग पाडता येत नाही..
म्हणुन जर एखादी व्यक्ती मनात घर करुन गेली
तर त्याच वेळी खाञी करुन घ्यावी..
नाहीतर आयुष्यभर विरहाचे जिवण जगण्यास
खंबीर राहावे.... Soooooooo
प्रपोज करा जर कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर ...
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावेचं .
S.K

"वो हमारा इमतिहान क्या लेगी,

"वो हमारा इमतिहान क्या लेगी,
मिलेगी नजरों से नजर तो नजर झुका लेगी,
उसे मेरी कब्र पर दिया जलाने को मत कहना,
वो नादान है दोस्तो अपना हाथ जला लेगी।"
S.K

काही आठवणी विसरता येत नाहीत

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत
गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत 
नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त
नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!
S.K

शोना कदाचित तु ही

शोना कदाचित तु ही
असाचं विचार करत असशील...!!
छान होतास रे तु,
पण जमलं नाही मला,
कळत होतं रे तुझं प्रेम,
पण माझं चुकलं रे
जरा.....
असा नको विचार करूस कि,
मी विसरलेय तुला,
मनात खोल कुठेतरी,
आठवणीमध्ये साठवलंय
तुला.....
आठवते मलाही आपले ते स्वप्नांचे घर,
तुझ्या खांद्यावरून
पाहिलेली ती पावसाची सर..
वेळोवेळी तू
दिलेली माझ्या हक्काची साथ,
अनवाणी वाळूत
चालताना माझा धरलेला हात.....
हातावर रंग ठेवून उडाले पाखरू,
पण तू असं जगणं नको सोडूस,
स्वप्न बघ तू नवीन,
तुटलाय आपल्या घराचा वासा.....
आता पुन्हा नको जोडूस,
भेटली ना मी कधी तर,
पाहून मला रडू नको वेड्या,
कसंबसं सावरलंय मी स्वःताला.....
आता पुन्हा बांधू नको बेड्या,
आताही तुझी आसवं
मला नाही बघवणार,
तुझे भिजलेले डोळे,
मला नाही पहावणार.....
धावत येईन मी तुला सावरायला,
स्वःताच्या प्रेमाला रडताना पाहून,
स्वःताला कसं आवरणार ???
व्हायचं असेल तर,
सगळं होईल रे ठिक,
पण वाट नको पाहूस,
माझ्याशिवाय चालायला शिक.....
माझ्याशिवाय चालायला शिक.....
S.K

मुलींच्या मागे मुलींच्या मागेभरकटलेली मुलं..


मुलींच्या मागे
मुलींच्या मागेभरकटलेली मुलं..
माझ्या मनात कधीकधी विचार येतात..
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???
Chance मिळाला तर प्रत्येक मुलीला
पटवायचा प्रयत्न करतात..
जर नवीन नाही पटली तर?
जुन्या GirlFriend वर भागवतात..
Hi-Hello करून ओळख होताच,
Date वर यायची विचारणा करतात..
स्वःताच्या किंवा वडिलांनी कमावलेल्या,
पैशांची मात्र वाट लावतात..
जराशी ओळख होताच मागे लागून,
तिचा Cell Number
मिळवायचा प्रयत्न करतात..
तिच्या बरोबर Dating वर जाऊन,
स्वःत बरोबर तिचा ही वेळ वाया घालवतात..
आकाशातले चंद्र-तारे तोडून आणन्या पर्यंत,
नको त्या फुसक्या मारतात..
तिने लग्नं कधी करतोस विचारताच,
तिच्या पासून लांब पळू लागतात..
एक GirlFriend पटवून
हे कधी शांत बसलेच नाहीत,
म्हणून तर अभ्यास करायचा सोडून..?
ह्यानी मुलींच जास्त पटवलेल्या असतात..
पड पड धडपड करून एखादी,
नोकरी कशीबशी मिळवतात..
पण शेवटी सवई प्रमाणे Office मधे सुद्धा,
Line मारायला सुरुवात करतात..
एक हृदय तुमच्या जवळ आहे,
त्याचे तुकडे किती करणार आहात..?
किती ही मुली पटवल्या तरी,
लग्न मात्र ऐकिशीच करणार आहात..?
S.K

मैत्री* च नाव काय ठेवू ?

मैत्री* च नाव काय ठेवू ?
*'स्वप्न'* ठेवलं तर अपूर्ण राहील...
*'मन'* ठेवलं तर कधीतरी तुटेल,

मग विचार केला की *'श्वास'* ठेवू
म्हणजे मरेपर्यंत *'सोबत'* राहील...

S.K

टाईमपास आपला प्रेम तुला समजलाच नाय…

टाईमपास आपला प्रेम तुला समजलाच नाय…
टाईमपास आपण केलाच नाय
वळून तर बघायचा होता जरा
आपल्याला आता हसताच येत नाय
नाका सोडला कट्टा रुसला तुझ्या
जाण्याने बदल कसा झाला…
उनाड दिवसाच्या टवाळक्या आता
परत कुणालाच दिसल्या नाहीत
आपण असा बदलेल असा वाटायचा नाय…
तु बदलवलस गं आपल्याला
आता आपला काय खरा नाय
तसा तर आपण मरणार नाय…
पण आता जगण्यातही
मजा उरला नाय…
साला आपल्याला कळलाच नाय
आपण खरा प्रेम केला
टाईमपास कदी जमलाच नाय...
S.K

ती म्हणाली,,



ती म्हणाली,,
" खुप खोटं बोलतोस तु माझ्याशी.. "
.

मी म्हणालो,,
" जर मला तुझ्याशी खोटं बोलता आले असते
तर आपलं नाते कधी तुटलेच नसते...!! "

S.K

माझा तुझ्यावर विश्वास आहे...



माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत,.
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल
करणं मात्र कठीण असत
.
प्रेमात खोट
बोलन सोप असत,
.
पण खर बोलून
प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत.
S.K

Monday, 11 April 2016

सादर आहे संपूर्ण व्हर्च्युअल रोमान्स ..

सादर आहे संपूर्ण व्हर्च्युअल रोमान्स ............
शुक्र तारा, मंद वारा,
गूगल वर व्हेदर पहा...
वायफाय आहे , ब्रॉडबैंड आहे ,
चांदणे स्क्रीनवर पहा...
फेसबुक वरती शेअर करुनी,
माझी तू काँमेंट पहा
तू सदा ऑनलाइन रहा...
मी कशी फेसबुकवर सांगू
भावना माझ्या तुला...
तू मला समजुन घे रे
व्होंट्सअप वरूनी साजणा...
मेसेजिंगचा छंद माझा
आज तू पुरवून पहा...
तू सदा ऑनलाईन रहा...
लाजरा तू फ्रेंड माझा
मेसेंजर उघडून पहा
व्हायबर आणि स्काईप वरुनी
तू माझ्या डोळ्यात पहा
हेडफोन आणि माईक लावुनी
तू आता युट्यूब पहा...
तू सदा ऑनलाईन रहा...
शोधिले मी नेटवरुनी
पीसी टॅब मोबाईल वरी
फ़ोटो बनुनी आलास तू रे
माझ्या फेसबुक पेजवरी...
भरलिस माझी रँम सारी
हँग झाले मी पहा...
तू सदा ऑनलाईन रहा...

S.K

Wednesday, 6 April 2016

कोणी म्हणतं .....................,,,,,,,,,,,,



कोणी म्हणतं
seven days and six nights चं
package म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो
चांदणी रात्र,
एक झोपाळा, आणि
हातात तिचा हात
म्हणजे प्रेम.


कोणी म्हणतं पॅरीसच्या
संध्याकाळची,
रोषणाई म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो तिला अचानक
भेट दिली की,
तिच्या डोळ्यातली
ती चमक म्हणजे प्रेम.

कोणी म्हणतं काश्मीरच्या बागेत,
एकत्र फिरणं म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो न सांगता,
एखादा गजरा तिच्या डोक्यात माळणं
म्हणजे प्रेम.

कोणी म्हणतं फॅन्सी आणि
स्टाईलिश कपडे घालून
नवऱ्याबरोबर फिरणं,
म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो सणाच्या दिवशी
नटलेल्या तिच्याकडे
डोळे भरून पहाणं
म्हणजे प्रेम.

कोणी म्हणतं
तिला गुलाबाचा गुच्छ देणं
म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो सगळ्यां देखत
एक क्षण चोरून तिला
"छान दिसतेस"
असं म्हणणं आणि
ते ऐकून तिचा चेहरा
गुलाबी होणं म्हणजे प्रेम.

कोणी म्हणतं
तिच्या सुंदरतेवर कविता करणं
म्हणजे प्रेम. ?
मी म्हणतो ती माहेरी असताना
प्रत्येक कवितेत तिला पाहणं
म्हणजे प्रेम.

कोणी म्हणतं
लाजेचा पडदा काढून
एकामेकांना जाणून घेणं
म्हणजे प्रेम. ?

मी म्हणतो लग्नाच्या
१५ वर्षानंतर सुद्धा,
उखाणा घेताना तिचं लाजणं
म्हणजे प्रेम. .

S.K

Miss You So Much........,



आज‬ नाहीस ‪‎तू आयुष्यात‬ माझ्या
मी तरी ‪‎जगतोच‬ आहे..
‪वाचायला‬ नसली ‪‎तू‬ जरी,
‪मी‬ अजून ‪लिहितोच‬ आहे..

S.K

Tuesday, 5 April 2016

कधी तरी मन उदास होते................,.



कधी तरी मन उदास होते
हळु हळु डोळ्याँना त्याची
जाणीव होते .
आपोआप पडतात डोळ्यातून आश्रू
जेव्हा
आपली माणस दुर असल्याची
जाणीव होते.

S.K

तु भेटशील तेव्हा..............,

तु भेटशील तेव्हा,
खुप काही बोलायचे आहे...//
थोडे फार भांडण,
खुपसे प्रेम करायचे आहे...//
मनात साठवलेल्या शब्दांचे कोडे,
उलगडायचे आहे...//
प्रत्येक विरहाचा जाब,
तुला विचारायचा आहे...//
पण हे सारे......./
तू भेटशील तेव्हा...?
सध्यातरी तुझी वाट बघणे,
हा एकच छंद जीवाला जडला आहे...//

S.K

प्रेम केलय ग............

प्रेम केलय ग
तुझ्यावर प्रेम,
काळजामध्ये आपल्या
स्वप्नांच घर केलय. .
.
तुला पाहिलं की,
मनामध्ये धुन वाजते. .
.
अन तुझ्याच छम छम पैंजनाची,
जणू
त्यांना साथ मिळते. .
.
तुझ्या
एक एक मेसेजने,
माझ इनबॉक्स
फूल केलय ग. .
.
प्रेम केलय ग
तुझ्यावर प्रेम केलय ग. .
.
आभाळही
असतेच असे,
ढगांनी भरलेले,
तुझ्या माझ्या नात्यात, बी
कुणी पेरलेले. .
.
तुझ्या
गालावरच्या खळी ने,
मला पार
मदहोश केलय ग. .
.
प्रेम केलय ग
तुझ्यावर, प्रेम केलय ग. .
.
हरवलय कुठे तरी,
नक्षत्रांच्या गर्दीतलं चांदणं. .
बनूणी चंद्रकोर
तुझ्या, कपाळी गोंदण. .
.
तुझ्या
चंद्रासारख्या मुखड्याने,
माझ आकाश
निरभ्र केलय ग. .
.
प्रेम केलय ग
तुझ्यावर,
प्रेम केलय ग. .?

S.K

पुन्हा प्रेम करणार नाही.....

भेट आपली शेवट्ची असुन,निरोप घेत आहे…
वरुन शांत असलो तरी,ह्र्दयात रडत आहे…
तु जात आहे सोडुन मला,नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहायच्या ,शुभेच्छा देतो तुला…
निरोप तुला देताना,अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्यांना,सोबत वाहुन नेतील…
त्या वाहणारय़ा अश्रुतही,प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला,प्राण मात्र त्यात दिसेल…
वाट आपली दुभंगली,आता परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला,तरी मार्ग एक होणे शक्य नाही…
आठवण तु ठॆवु नकोस,मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी,वाट पाहणे सोड्णार नाही…
जातेस पण जाताना एवढे,सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण,...ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी,...मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यक्षात नाही तरी,…डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी,…नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अंत:करणाची,…खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील....
तो आठवण्या पुरता तरी तु,…नक्कीच माझी राहशील ....
नजरेने जरी ओळखलेस तु,…तरी शब्दानीं मी बोलणार नाही....
तुझ्या माझ्या आयुष्यात,…नसती वादळ असणार नाही...
नेहमीच पराभव झाला तरी,….हक्क तुझ्यावर सांगणार नाही....
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही…
तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही…

S.K

Thursday, 31 March 2016

का कधी कधी अस होत..?

का कधी कधी अस होत..?
आपण कोणावर इतके प्रेम करतो...!!
पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते...!!
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते...!!
पण त्याला त्याची अजिबात कदर नसते...!!
का कधी कधी अस होत...?
कि त्या व्यक्तीशिवाय आपण अजिबात राहू शकत नाही...!!
पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते....!!
का कधी कधी अस होत..?
आपण कोणावर इतके प्रेम करतो....!!

Wednesday, 30 March 2016

तू माझी अन् मी तुझा होणार...!!

तू माझी अन् मी तुझा होणार...!!
आज पुन्हा ते घडणार,
तू माझ्या आयुष्यात येणार,
दुःखाचा मुखवटा काढून,
मी खळखळून हसणार.....
अबोल मनातले भाव,
पाणावलेले डोळे व्यक्त करणार,
थोड्यावेळ शांत राहून,
तू मला घट्ट मिठी मारुन रडणार.....
नजरेने नजरेशी हितगुज करत,
मी तूला मला I Love You बोलणार,
ह्रदयात रुतलेले वेदनेचे काटे,
तू नाजूक हाताने काढणार.....
अधु-या राहीलेल्या अपेक्षा माझ्या,
आज सत्यात उतरणार,
या सुकलेल्या भंगार निवडुंगाला,
प्रितीचा नव संजीवनी मिळणार.....
विसरुन जूने वाद सारे,
तू अन् मी नव्याने भेटणार,
आठवून जूने क्षण सारे,
तू माझी अन् मी तुझा होणार.....

Wednesday, 16 March 2016

"तुझ्या आठवणी...!"

"तुझ्या आठवणी...!"
.
पुसट होत चाललेल्या,
तुझ्या आठवणी....
तरी मनात घर करून बसलेल्या,
तुझ्या आठवणी....
.
डोळ्यात पाणी आणणा-या,
तुझ्या आठवणी....
मग लगेचच हसवणा-या देखील,
तुझ्याच आठवणी....
.
चांदण्या रात्री माझ्यासोबत बसणा-या,
तुझ्या आठवणी....
आपली कहाणी चांदण्यांना सांगणा-या,
तुझ्या आठवणी....
.
माझ्यासोबत कविता करणा-या,
तुझ्या आठवणी....
त्या कविता गाणा-या देखील,
तुझ्याच आठवणी....
.
माझ्यासोबत पावसात भिजणा-या,
तुझ्या आठवणी....
खिडकीतून पावसाचे थेंब वेचणा-या देखील,
तुझ्याच आठवणी....
.
माझ्याशी सतत बडबडणा-या,
तुझ्या आठवणी....
मग अचानक मुके होणा-या देखील,
तुझ्याच आठवणी....
.
कितीही हरवल्या तरी,
परत सापडणा-या तुझ्या आठवणी....
तुझ्याविना जगताना पण आता,
उरल्यात त्या फक्त तुझ्या आठवणी....
.
तुझ्या आठवणी....
फक्त तुझ्याच आठवणी....

मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार नाही,

मी तुझ्या स्वप्नातला राजकुमार नाही,
तरीही मी तुझ्यासाठी काही खास आहे,
मी फक्त तुझा आणि तु फक्त माझी आहेस...!
.
मी तुझ्यापासुन दुर जरी असलो,
तरीही तुझ्यात मी न् माझ्यात तु आहे,
माझे हृदय तुझे न् तुझे हृदय माझे आहे...!
.
तु न् मी कधी नजरे समोर नसलो,
तरीही तुझ्या नझरेत मी न्,
माझ्या नझरेत फक्त तूच आहेस...!
.
तु कधीही माझी होऊ शकणार नाहीस,
तरीही तूच माझे स्वप्न आहेस,
आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस...!
.
तुच माझी वेदना,
तुच माझी भावना,
तूच माझे जीवन आणि
माझे जीवन हे फक्त तुझ्यासाठीच आहे..!

हे आयुष्यभर कधी तु विसरू नकोस...!

विसरून जा मला, माझ्या आठवणींना,
पण माझे शब्द कधी विसरू नकोस...!
.
बोलू नकोस कधी माझ्याशी,
पण आपण तास न् तास बोलायचो कधी तरी,
हे मात्र विसरू नकोस...!
.
भेटू नकोस मला कधीच,
पण माझी आठवण मात्र विसरू नकोस...!
.
जा विसरून मला,
पण माझ प्रेम कधी विसरू नकोस...!
.
सुखी रहा आहेस तिथे,
पण दु:खात आवाज द्यायला मला विसरू नकोस...!
.
नकोस करू काळजी माझी,
पण स्व:ताची काळजी घ्यायला विसरू नकोस...!
.
तुझ्यासाठी मी काही खास होतो,
तु सारखी माझी स्तुती करायचीस...!
.
पण माझ्यासाठी तू एकटीच होतीस,
हे आयुष्यभर कधी तु विसरू नकोस...!

जानु तुझी खुप आठवण येते.

सवय आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची,
तू ऐकत नसतानाही...!
.
सवय आहे...
तुला पहात बसण्याची,
तू समोर नसतानाही...!
.
सवय आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची,
तो येणार नसतानाही...!
.
सवय आहे...
मन मारून झोपण्याची,
झोप येणार नसतानाही...!
.
सवय आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची,
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही...!

Sunday, 28 February 2016

ती म्हणाली. .
तू मला इतका कसा
ओळखतोस,
कितीदा भेटलास
मला की, 
माझ्यासाठीच जगतोस. .
आपण एकत्र घालवलेले
क्षण,
किती थोड़े
होते,
तरी का रात्रं-दिवस
तुला
माझीच
'आठवण' येते. .
नीट पहिलेहि
नसशील,
तू मला
डोळे
भरून,
तरी मी छळते
तुला का, रोज
स्वप्नी
येऊन.?
हे असं होण शक्य
तरी कसं आहे,
नक्की
माहित नाही,
पण माझीही
गत
तीच आहे. .
मी म्हणालो. . अगं वेडे,
क्षण एकच
पुरे होता,
जो तुझ्यामुळे
मी जगलो. .
अन् कुणी सांगितलं
क्षण ते दोघांचे
थोड़े होते,
तुझ्या आठवणीने
दिवस उगवतो,
आठवणीनेच
रात्र होते. .
येता जाता
उठता बसता,
क्षण न क्षण
मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं
सखये मी, नित्य नवा
असा जगतो. .
तुला दु:ख
होतं
तिथे अन्,
आसवे मी
गाळतो,
तुला लगते
ठेच
तिथे अन् पाय
माझा रक्ताळतो. .
तुला वाटेल का बरे हा
नित्य
माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन
अगं वेडे,
मी तुझ्यावर
प्रेम
करतो. .!¡
Mr.aLone

Tuesday, 23 February 2016

माझ्या_जगण्याला‬ काही अर्थ असेल का ..?


तरी ते ‪#‎शक्य‬ आहे का..??

तुझ्या पासून ‪#‎वेगळं‬ होवून 
माझ्या ‪#‎जीवनाला‬ काही अर्थ आहे का..??

तुझ्या इतक ‪#‎समजून‬ घेणारी मला 

आणि जरी ‪#‎मिळाली‬ तरी 
‪#‎तुझ्या‬ डोळ्यातलं ‪#‎प्रेम‬ मी ‪#‎तिच्या‬ मध्ये ‪#‎शोधू‬ शकेल का....??

#तुझ्या मध्ये मिळणारा ‪#‎आधार‬ 
‪#‎तुझी‬ माझ्यासाठी असलेली ‪#‎काळजी‬ 

आणि तू ‪#‎म्हणतेस‬ #आठवण काढू ‪#‎नकोस‬......

‪#‎तुझी_आठवण‬ न काढता 
‪#‎माझ्या_जगण्याला‬ काही अर्थ असेल का ..?

प्रेम केले होते ना माझ्यावर,

प्रेम केले होते ना माझ्यावर,
मग का ?????
विश्वास ठेवलास तु नशिबावर..

मी कधीचं सोडणार नाही,

वचन दिले होते न तू मला..
मग का  ?????
ते तोडताना काहीचं वाटले नाही तुला ?


किती विश्वास होता माझा तुझ्यावर..
तू दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवर,
किती विश्वास होता माझा आपल्या नात्यावर..

तू केलेल्या प्रेमावर,
आई वडील तर मला पण होते रे..
तुझ्यासाठी त्यांच्याशी खोटे बोल्ली रे,
आई वडिलांचे कारण देऊन तू मला कसे सोडले रे..

अचानक त्यांचे उपकार आठवून,
तुझे माझे नाते कसे तोडले .
का नाही लढल्लास माझ्यासाठी,
आपल्या ख-या प्रेमासाठी ?

का केले होतेस प्रेम टाईमपासासाठी,
की माझ्या भावनाशी खेळण्यासाठी....

Wednesday, 10 February 2016

मला हि प्रेम कारावास वाटत पण


मला हि प्रेम कारावास वाटत पण
माझ्यावर प्रेम कोण करणार.
मला हि कुणावर तर रागवावस वाटत पण
माझ्यावर कोण रागवणार.
मला हि चेष्टा करावीशी वाटते पण
माझी चेष्टा कोण करणार.
मला हि कुणावर तरी कविता लिहावीशी
वाटते पण माझ्या कविता समजून कोण
घेणार.
मला हि खूप रडावेसे वाटते पण माझे
अश्रू कोण पुसणार.
मला हि खूप काही करावेसे वाटते पण मला
मार्ग कोण दाखवणार.
स्वप्नवत आहे माझे आयुष्य या आयुष्याचा
आधार कोण बनणार.
जन्माला येताच आयुष्याची पाटी कोरीच
होती पण आता त्यावर
बाराखडी कोण लिहिणार.
माझ हि अस्तित्व आहे या जगात याची
जाणीव मला कधी होणार.
हि एक कविता आहे पण
याच्या मागची भावना कधी इतरांना
कळणार...........

Sunday, 24 January 2016

That's how much I Love You....

Everytime you hurt me,
but,
i dont get angry with you.
Everytime it pains,
but,
i dont say a word to you.
Everytime you say sorry,
i forgive you on the spot.
Because...
Everytime you make a mistake,
I punish myself.......
That's how much I Love You

Friday, 22 January 2016

फक्त तिच्यासाठीवाटायचे आयुष्य जगावे...


फक्त तिच्यासाठीवाटायचे आयुष्य जगावे
फक्त तिच्यासाठी,जिवंत रहाव फक्त
तिच्यासाठी
,पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी,सांगेल
तस
वागाव फक्त तिच्यासाठी,तिच्या हो ला
हो म्हणाव
फक्त तिच्यासाठी,तिला हव ते द्याव
फक्त तिच्यासाठी,
तिला हव तेच जेवाव फक्त
तिच्यासाठी,तिला हव तिथे फिरवाव
फक्त तिच्यासाठी,
स्वताहातला मी पणा मारुन टाकावा
फक्त तिच्यासाठी
,स्वतहाचे अश्रू आनंदश्रू म्हणून दाखवावे
फक्त तिच्यासाठी,
नेहमी सुखात आहे अस धॉंग करव फक्त
तिच्यासाठी,
सगळ सोडून टिचाकडे जावं फक्त
तिच्यासाठी
,आणि तिने फक्त आयुष्यभरबरोबर राहावे
माझ्यासाठी......

Wednesday, 20 January 2016

आज पुन्हा

आज पुन्हा तिची न माझी,
दुस-यांदा भेट झाली,
मला पाहताच हडबडून ती,
i love u खडूस म्हणाली.....
.
.
हळू हळू येऊन जवळ,
ती माझ्या मिठीत विसावली,
माझ्या नजरेत नजर घालून,
नजरेने बोलू लागली.....
.
.
किती रे मस्त आहेस तु,
असे बोलून माझे कौतुक करु लागली,
खुप प्रेम करते रे मी तुझ्यावर,
असे म्हणुन ती खांद्यावर रडू लागली
.
.
खरच मी त्रास देते ना तुला,
म्हणुन sorry रे शोन्या म्हणु लागली,
काय करु रे मी वेडू,
असे बोलून ती मला छळू लागली..
.
.
अशाच एकांत ठिकाणी,
ती मला घेऊन जाऊ लागली,
अथांग पसरलेल्या समुद्राच्या
लाटासोबत,
ती माझ्या अंगचटीली येऊ
लागली.....
.
.
असं सांगायच तर ती,
जरा मंदच वाटू लागली,
पण ती पागल असली तरी,
मला अधिकाधिक आवडू लागली.....
.
कारण ???
तिच्याशिवाय मला करमतच नाही,
एक क्षणही राहवतच नाही,
खरं तर डोळ्यातून ती माझ्या,
हळू हळू ह्रदयात उतरु लागली...

Tuesday, 19 January 2016

आता संपलंय ते भास होणे,

आता संपलंय ते भास होणे,
तू नसल्या ठीकाणी तुला पाहणे,
तू समोर आल्यावर,
स्वतःलाच विसरुन जाणे,
आता संपलंय ते सारं...

आता संपलंय ते तुझे शब्द आठवणे,
तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि
तुल एकटक बघत रहाणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलंय तुझ्यासाठी घरी थापा मारणे,
Extra-Class च्या नावाखाली तुला भेटणे,
तासन् तास बोलत रहाणे,
आणि
फोन चे बिल वाढवणे,
आता संपलंय ते सारं...

आता संपलीयेत ती भांडणे,
शुल्लक गोष्टीवरुन रुसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,
आणि
नंतर मीच Sorry Sorry Sorry म्हणणे,
आता संपलंय ते सारं...

आता संपलंय एकटं असता तुला आठवणे,
तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,
आणि
कधी हळुच अलगद डोळ्यातून पाणी ओघळणे,
आता संपलंय ते सारं...

आता संपलंय ते तुझ्यासाठी श्वास घेणे,
तुझ्यासाठी जगणे,
आणि
तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवर कविता करणे,
आता संपलंय ते सारं....